बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात लहान मुलांना होतोय कोरोनाचा संसर्ग; तब्बल 166 मुलं कोरोनाबाधित

अहमदनगर | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रामध्ये हाहाकार माजवला आहे. रुग्णसंख्या वाढली असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसरी लाट येणार असल्याचीही शक्यता काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, अशी शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. त्यातच दुसऱ्या लाटेमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात लहान मुलांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

अहमदनगरमध्ये 1 ते 14 या वयोगटातील तब्बल 166 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. गेल्या 10 दिवसातील कोरोनाबाधित लहान मुलांची आकडेवारी घेण्यासाठी टास्क फोर्सने आयोजन केलं आहे. अहमदनगरमध्ये लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने पालकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना धोका असल्याचं बोललं जात असतानाच महाराष्ट्रातील अहमदनगरमध्ये 166 लहान मुलांना कोरोनाची लागण झाली असल्याने चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान, यासंबंधी प्रशासन नेमकं काय पावलं उचलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

टुलकिट प्रकरणाला नवं वळण; दिल्ली पोलिसांची ट्विटर इंडियाला नोटीस

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात एका दिवसात आढळले फक्त 94 कोरोनाबाधित रुग्ण

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

मुंबईत आमदाराच्या पत्नीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ, ‘हे’ दिलं कारण!

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! बापानेच अल्पवयीन मुलांच्या डोक्यात दगड घालून केली हत्या त्यानंतर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More