देश

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

पाटणा | पटणात एका लग्नात हजर असलेल्या 100 हून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ उडाली आहे. या लग्नातील नवरदेवाचा लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी मृत्यू झाल्याचं कळतंय.

संबंधित नवरा सॉफ्टवेअर इंजिनियर होता. तो गुरुग्राम येथे नोकरी करत होता. काही दिवसांपूर्वीच तो लग्नासाठी पटणा येथे आला होता.नवरदेवाच्या मृत्यूनंतर त्याची कोरोना चाचणी घेतली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यामुळे आरोग्य यंत्रणांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होण्याचं बिहारमधील हे पहिलंच प्रकरण असल्याचं बोललं जात आहे. नवरदेवाच्या मृत्यूची माहिती मिळून त्याची चाचणी घेण्याआधीच मृताच्या कुटुंबीयांनी त्याच्यावर अंतिमसंस्कार केले, असं प्रशासनाने म्हटलं आहे.

जिल्हा प्रशासनाला नवरदेवाच्या मृत्यूची माहिती मिळताच लग्नात सहभागी झालेल्या सर्वांच्या कोरोना चाचणी करण्यात आल्या. आतापर्यंत यात 100 हून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालंय.

ट्रेंडिंग बातम्या-

अ‍ॅपल आणि गुगलचा TikTok ला दणका; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“या युद्धात शरद पवार यांनी एक काडी टाकली अन्…..”

महत्वाच्या बातम्या-

राज्यात आज ४८७८ नवीन रुग्णांचे निदान तर रिकव्हरी रेट ५२ टक्क्यांवर कायम!

सॅनिटायझर प्यायल्याने नागपुरात सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

#DoctorsDay- ‘कोरोनासारख्या संकटाविरूद्ध लढणाऱ्या डॉक्टरांना सलाम’

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या