बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात होत आहे कोरोनाची लागण

पुणे | संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येऊन ती अपुरी पडत असल्याचं गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. तसेच तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना कोरोना संक्रमणाचा धोका अधिक असल्याचं बोलून दाखवलं होतं. पण पुणे जिल्ह्यात लहान बाळांना मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग होत असल्याचं भयावह चित्र पाहायला मिळत आहे.

पुणे जिल्ह्यात एक वर्षाखालील तब्बल 249 लहान बाळांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. तिसरी लाट येण्यापूर्वीच लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जिल्हा आरोग्य विभागाने याबाबत माहिती देत पुणे जिल्ह्यात लहान मुलांना संसर्गाचा धोका अधिक असल्याचं स्पष्ट केलं आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात तिसऱ्या लाटेपूर्वीच लहान मुलांना कोरोना संक्रमण पुणे जिल्ह्यात होत असल्याने लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन जिल्ह्यातील आरोग्य विभागाने नागरिकांना केलं आहे. याबरोबरच पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या हळूहळू कमी होत असली तरी नागरिकांनी आणखी सतर्क राहून कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला मदत करावी असं देखील आवाहन केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या –

पुण्यात लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य; आजपासून मिळणार लसीचा दुसरा डोस

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर

कोरोना रूग्णांसाठी ‘हे’ प्रभावी औषध बाजारात येणार; DRDO चेअरमनची घोषणा

महाराष्ट्रातील आणखी एका जिल्ह्यात कडक लॉकडाऊनला सुरुवात

अंगावर काटा आणणारा अपघात! गाडीची धडक झाल्यावर तरूण उडाला हवेत…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More