बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तब्लिगीमुळे 14 राज्य व्हेंटिलेटरवर; तब्बल 647 जणांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | दिल्लीतील तब्लिगी जमातच्या तब्बल 647 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यात 14 राज्यांच्या नागरिकांचा समावेश असल्याने या राज्यांमधील आरोग्य यंत्रणांची धाकधूक वाढली आहे.

गृहमंत्रालयाने भारतात पर्यटक व्हिसावर आलेल्या आणि तब्लिगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 960 परदेशी नागरिकांना काळ्या यादीत टाकलं आहे. तब्लिगी जमात कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या देशात परतलेल्या सुमारे 360 परदेशी नागरिकांनाही अशाच प्रकारे काळ्या यादीत टाकण्यात आलं आहे.

आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि परदेशी नागरिक कायद्या अंतर्गत 960 परदेशी नागरिकांविरोधात कारवाई करण्यात येत आहे. यावेळी हद्दपारीचा प्रश्नच उदभवत नाही. जेव्हा हद्दपार करायची असेल तेव्हा आदर्श आरोग्य नियमावलीनुसारच तशी कारवाई केली जाईल, अशी माहिती गृहमंत्रालयाने पत्रकारांना दिली.

दरम्यान, सध्या भारतात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 586 पर्यंत पोहचला आहे. यातील 156 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

‘आता लोकांनी आग लावली नाही म्हणजे झालं’; संजय राऊतांची मोदींवर बोचरी टीका

‘कोरोना’शी लढा देणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा!

महत्वाच्या बातम्या-

“मोदी म्हणजे ‘बिग बॉस’, आठवड्यातून एकदा येऊन नवा टास्क देऊन जातात ”

मुंबईत डीसीपी रँकचा पोलीस अधिकारी कोरोना संशयित!

नरेंद्र मोदींनी मान्य केला उद्धव ठाकरेंचा ‘हा’ सल्ला, म्हणाले….

टेलिग्रामवर सर्व ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच पुढील लिंकवर क्लिक करा- https://t.me/thodkyaatNews

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More