बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाळा उघडताच कोरोनाचा शिरकाव; 20 विद्यार्थीं कोरोना पाॅझिटिव्ह सापडल्यानं खळबळ

चंदिगड | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून देशातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. देशात सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिलं जात होतं. आता कोरोना रूग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आता अनेक राज्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्यांनी घेतला आहे. महाराष्ट्रात देखील येत्या 17ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येणार आहे. त्यातच आता शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं पालकांच्या चिंता वाढल्या आहेत.

कोरोना कमी झाल्यानं पंजाब सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे शाळा देखील सुरू करण्यात आल्या. मात्र, शाळा सुरू केल्यानंतर काही दिवसातच विद्यार्थी कोरोना पाॅझिटिव्ह येऊ लागले. शाळा सुरू झाल्यानंतर पंजाबमधील सरकारी शाळेत 20 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंर प्रशासन देखील खडबडून जागं झालं आहे.

पंजाबमधील दोन सरकारी शाळांमध्ये कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. शाळा सुरू केल्यानंतर पंजाबच्या मुख्य सचिवांनी प्रत्येक शाळेमध्ये कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर शाळांमध्ये चाचण्या केल्या गेल्या. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त धोका असल्याचं सांगितलं जात होतं. त्यातच आता शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानं पुन्हा शाळा बंद करण्याची वेळ सरकारवर आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून ‘चला मुलांनो शाळेत चला’ ही मोहिम राबवली जात आहे. कोरोना कमी असलेल्या ग्रामीण आणि शहरी भागात येत्या 17 ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यात येणार आहे. आता दुसऱ्या राज्यात शाळांमध्ये कोरोनाचा शिरकाव होत असल्यानं राज्यातील पालक देखील मुलांना शाळेत पाठवण्याबाबत चिंतेत आहेत.

थोडक्यात बातम्या-

“भाजपला मराठा आरक्षणाचं श्रेय हवं असेल तर…”

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

घरची गरिबी, वडिलांचा पानाचा ठेला, पण क्रिकेटचा नादच बेक्कार, आता थेट इंग्लंड दौऱ्यावर!

बालाजी तांबेंच्या ‘या’ तक्रारीमुळे बाळासाहेब ठाकरेंनी हातात घेतली होती काठी, वाचा थोडक्यात किस्सा!

आनंदाची बातमी! ‘या’ तारखेपासून शाळेची घंटा वाजणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More