बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार’; माजी मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य

नवी दिल्ली | कोरोनाने देशभरात हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा सामना करताना अनेकांना आपल्या प्राणांचा बळी द्यावा लागत आहे. मात्र अशातच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

तसं पाहिलं तर करोना विषाणू सुद्धा एक जीव आहे. बाकी जीवांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. मात्र आपण स्वत:ला बुद्धीमान समजतो. आपण त्या विषाणूला संपवण्यासाठी तयार आहोत. मात्र त्यामुळेच तो जगण्यासाठी स्वत:मध्ये सतत बदल घडवतोय, असं त्रिवेंद्र सिंह रावत यांन म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

कोरोनासुद्धा जीव आहे, त्याला जगण्याचा अधिकार, रावतांच्या अशा विचित्र वक्तव्याने विरोधी पक्षांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. रावतांच्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे. यावरून काँग्रेसच्या डिजिटल टीममधील सदस्य आणि नेते असणाऱ्या गौरव पांधी यांनाही रावत यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, अशा लोकांमुळेच आपल्या देशाला आज कोरोना संकटाचा समाना करावा लागत असल्याचं गौरव पांधी यांनी म्हटलं आहे. पांधी यांनी याबाबत एक व्हिडीओही शेअर केला आहे. कोरोना एक जीव आहे तर त्याला आधारकार्ड आणि रेशन कार्डही द्यायला हवं असा उपरोधिक टोला काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवाय यांनी रावत यांना लगावला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“भारत हिंमत हरलेला नाही, तुम्ही ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहात त्याची जाणीव आहे”

‘या’ खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह; भारतीय संघाच्या अडचणीत होऊ शकते वाढ!

“मी अमित शहा यांना 3 वेळा हरवलं”; प्रशांत किशोर यांचा दावा कितपत खरा?

‘जयंत पाटील हे तर…’; पाटलांच्या नाराजीवर अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले…

कोरोनानं अख्खं गाव सुतकात; तरूणांनी केली कमाल अन् गावासाठी उभारलं कोविड सेंटर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More