बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून महाराष्ट्रात कोरोना वाढतोय’; केंद्रीय पथकाने सांगितलं कारण

मुंबई | देशभरात सगळीकडेच कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. त्यात मुंबईत कोरोनाचा प्रसार मोठ्या वेगाने होतं आहे. राज्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात आली तरी कोरोनाचं संक्रमण का वाढत आहे? याची केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केली. यातून चिंताजनक सत्य बाहेर आलं आहे. नागरीकांचा समज झाला आहे, की आता कोरोना संपला आहे. त्यामुळे त्यांचा निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थानांच्या निवडणूका, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकलसह सर्व सार्वजनिक वाहतुक सुरू करणं अशा काही गोष्टींमुळे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे, असं केंद्रीय पथकाने सांगितलं.

लोकलमधील गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतं असल्याचं केंद्रीय पथकाने अहवालात सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव निपूण विनायक यांच्यासह तीन जणांच्या पथकाने 1 आणि 2 मार्चला हा कोरोना पाहणी दौरा केला.

कोरोना रूग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यावर लवकर नियंत्रण मिळवणं फार आवश्यक आहे. त्यासाठी सरकारने कोरोना रूग्णांचा शोध घेऊन कोरोना चाचण्यांची संख्या वाढवली पाहीजे. त्यासोबत कोरोना संबंधीत नियमांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे, अशा सूचना केंद्रीय पथकाने दिल्या आहेत. काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा आणि लसीकरण सुरू ठेवावं असंही केंद्रीय पथकाने सुचवलं आहे.

काल 7 मार्चला  महाराष्ट्रात 11,141 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 6013 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या वाढून 97,983 झाली आहे. महाराष्ट्रात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 22,19,727 पर्यंत गेली आहेत. राज्यात आतापर्यंत 52, 478 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, मुंबईत काल एका दिवसात 1361 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतीली कोरोनाबाधितांची संख्या वाढून आता 3,35,569 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 11504 झाली आहे.

थोडक्यात बातम्या

“कोरोना लसीत गाय आणि डुकराची चरबी, आमचा धर्म भ्रष्ट होईल”

सावळ्या रंगाच्या त्रासाला कंटाळून तरूणाने उचललं हे धक्कादायक पाऊल

राफेलचे मालक, फ्रान्सचे अब्जाधीश ओलिवियर दसॉल्ट यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

 महिलांनी कोणाचंही प्यादं बनून रहायची गरज नाही- राज ठाकरे

नवीन गाडी खरेदी करणाऱ्यांना मिळणार एवढी सूट; नितीन गडकरींनी केली ‘ही’ मोठी घोषणा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More