बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Corona: केजरीवालांना कोरोना होताच दिल्लीत केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं जगभरात थैमान घातलं आहे. यातच कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर नागरिकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. अनेक लोकांना कोरोनाची बाधा होत असलेली पहायला मिळत आहे. अशातच दिल्लीत ओमिक्राॅनच्या (Omicron) पार्श्वभूमीवर आता महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या पाहता देशात चिेतेचे वातावरण झाले आहे. अशातच दिल्लीत दिवसेंदिवस वाढत जाणारी रुग्णसंख्या पाहता दिल्लीत वीकेंट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्विट करत ही माहिती दिली. आता त्याच्यानंतर दिल्लीत वीकेंट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीत वाढत चाललेला पाॅझिटिव्ह रेट पाहता केजरीवाल सरकारनं हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, सध्या देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्राॅनची धास्ती पहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी लाॅकडाऊन करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

अंगावर काटा आणणारा भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद, पाहा व्हिडीओ

“जितेंद्र आव्हाड म्हणजे प्रस्थापितांना खूष करणारे कंत्राटी कामगार”

ओबींसींबाबत जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले…

धक्कादायक! लस घेतलेल्या ‘इतक्या’ टक्के नागरिकांना कोरोनाची लागण

नितेश राणेंना मोठा दिलासा; तुर्तास अटक होणार नाही

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More