पुणे | कोरोनाचा वाढता प्रभाव सध्या संपूर्ण देशात पहायला मिळत आहे. कोरोनाच्या विळख्यात आल्यामुळे कुटुंबच्या कुटुंबं उद्ध्वस्त झाल्याचं समोर येत आहे. आता पुण्यातील दोन सख्ख्या भावांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये राहणाऱ्या आदित्य जाधव आणि अपूर्व जाधव या दोन सख्ख्या भावांचा दोन दिवसात एकापाठोपाठ कोरोनामुळे मृत्यू झालाय. पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डी भागात जाधव कुटुंबिय राहतात. या घटनेमुळे आकुर्डी परिसरात शोककळा पसरली आहे.
दोघांना 20 दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु होते. आदित्य जाधव यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला होता. तर अपूर्वचा विवाह येत्या दिवाळीमध्ये होणार होता. रूग
कुटुंबात आई, वडील आणि आदित्य यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली. यात त्यांची आई आणि आदित्यची पत्नी या दोघीही कोरोनामुक्त झाल्या आहेत. तर वडिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिरुर येथील एका कुटुंबातील तीन भावांचा अवघ्या 15 दिवसात कोरोनाने मृत्यू झाला. पोपट धोंडिबा नवले यांचा 15 एप्रिल रोजी कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आणि उपचारादरम्यान 23 एप्रिल रोजी त्यांचं निधन झालं. त्यांनतर अवघ्या चार दिवसांनी 27 एप्रिल रोजी त्यांचा दुसरा भाऊ सुभाष धोंडिबा नवले तर 6 मे रोजी त्यांचा तिसरा भाऊ विलास धोंडिबा नवले यांचं निधन झालं. 15 दिवसातच एकाच कुटुंबातील तीन भावांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
थोडक्यात बातम्या-
‘माझी आईच जेवण बनवते पण 2 दिवस झाले ती झोपलीये,…’; आईच्या मृतदेहाजवळ बसून राहिली मुलगी
सावध व्हा, या शहरात 341 चिमुरड्यांना कोरोनाची बाधा, काळजी घ्याच…!
नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र आणि केरळला गुजरातपेक्षा जादा मदत करावी- सुब्रमण्यम स्वामी
“मविआ सरकारच राज्याला लागलेला कोरोना म्हटलं तर राऊतांना आवडेल का?”
“….नाहीतर गंगेत तरंगणाऱ्या पापांचे मालक म्हणून समोर या”
Comments are closed.