बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑक्सिजनची मागणी करणाऱ्या ‘या’ भाजप खासदाराच्या भावाचं कोरोनानं निधन!

नवी दिल्ली | कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे देशातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढली असून अनेक लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. अशातच बेड्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यादरम्यान उत्तरप्रदेशातील लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातील भाजप खासदार कौशल किशोर यांच्या मोठ्या भावाचंही कोरोनानं निधन झालं आहे.

कौशल किशोर यांच्या मोठ्या भावाला कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. किशोर यांच्या भावाचं नाव महावीर प्रसाद असं होतं.  आपल्या भावाच्या निधनावर दु:ख व्यक्त करत कोरोनाने माझा भाऊ हिरावून घेतला, असं ते म्हणाले. कौशल यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार कौशल यांचे मोठे भाऊ व्हेंटिलेटरवर होते.

कौशल किशोर यांनी काही दिवसांपुर्वीच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याकडे ऑक्सिजनची मागणी केली होती. किशोर यांच्या भावाच्या निधनाच्या एक दिवस आधी लखनऊच्या पश्चिम क्षेत्रातील भाजप आमदार सुरेश श्रीवास्तव यांचा देखील मृत्यू झाला आहे. सुरेश यांचा मृत्यू देखील कोरोनानेच झाला असून ते गेले 7 दिवस व्हेंटिलेटरवर होते. तसेच त्यांच वय 75 वर्ष असं होतं.

दरम्यान,कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी देशाला सध्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. सर्वच रुग्णालयांमध्ये ऑक्सिडनचा तुटवडा निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या-

‘वाॅर्डात फिरतो तेव्हा गोरगरिबांचे हाल बघवत नाहीत’; ‘या’ आमदाराने रेमडेसिविरसाठी 90 लाखांची FD मोडली

‘मासिक पाळीदरम्यान लस घेऊ नये’; त्या व्हायरल मेसेजवर सरकारने दिलं स्पष्टीकरण

लस घेतल्यानंतर कोरोनाचा कितपत संसर्ग होऊ शकतो?; समोर आली महत्वाची माहिती

“अर्थव्यवस्था गतिमान होण्यासाठी एका नव्या मनमोहन सिंगांची देशाला गरज”

क्रिकेट विश्वावर दुखा:चा डोंगर; 33 वर्षीय अश्विन यादवचं निधन

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More