बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनामुळे घरातील व्यक्तीचा मृत्यू, समाजकंटकांनी शेतातील कांदा केला नष्ट

पुणे | माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार जुन्नर तालुक्यात उघडकीस आल आहे. एकीकडे शेतकऱ्याचा कोरोनामुळे रुग्णालयात मृत्यू झाला असताना त्याच्या मागे शेतात काढलेल्या कांद्यावर काही समाजकंटकानी युरिया मिश्रित पाणी टाकल्याने मोठं नुकसान झालं आहे. राजुरी येथील ही घटना आहे. शेतकऱ्याच्या कांदा आरणीवर अज्ञात व्यक्तीने युरिया टाकल्याने सर्व कांदा खराब होऊन 1 लाख 20 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजुरी येथील सुनिता सुनील हाडवळे यांची त्यांच्या घराजवळ असलेल्या शेतातच कांद्याची आरण होती. आज सकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे त्यांचे दिर विलास हाडवळे हे कागद टाकण्यासाठी कांद्याच्या आरणी जवळ गेले असता आरणीतील कांदा पुर्ण पणे सडुन त्याचा वास येत होता. तर त्यांना या आरणीवर काही प्रमाणात युरिया आढळून आला. त्यांनी कांद्यावरील पात बाजुला केली असता आतमध्ये संपूर्ण कांदा सडलेला दिसून आला.

जवळपास 200 कांद्याच्या पोत्या भरतील एवढा कांदा या ठिकाणी होता. यापैकी फक्त 20 ते 25 पोत्या भरतील एवढाच कांदा थोड्या फार प्रमाणात राहिलेला आहे. या झालेल्या नुकसानीत जवळपास सध्या चालू असलेल्या बाजारभावानुसार 1 लाख 20 हजार रूपयांचे नुकसान झालेले आहे.

दरम्यान, सुनिता सुनील हाडवळे यांचे पती सुनील भगवंता हाडवळे यांचे परवा 13 मे रोजी कोरोनाने मुंबईत उपचार घेत असताना निधन झाले. घरातील सर्व जण खाजगी दवाखान्यात उपचार घेत असून घरची परिस्थिती अतिशय गरिबीची आहे. तसेच घरचा कर्ता माणुस गेल्याने दुसर्‍याच दिवशी अज्ञात व्यक्तीने केलेल्या नुकसाणीमुळे या कुटुंबावर मोठे संकट उभे राहिलेले आहे.

थोडक्यात बातम्या – 

“2022 मध्ये मोदी राष्ट्रपती बनतील, तेव्हा राष्ट्रपती राजवट लावून ते स्वत: सरकार चालवतील”

अरबी समुद्रातील वादळाचं रौद्ररुप, पुण्यावर काय परिणाम होणार?

 

काँग्रेस नेते व खासदार राजीव सातव काळाच्या पडद्याआड; कोरोनाशी झुंज अपयशी

अदर यांच्यानंतर आता वडील सायरस पुनावालाही लंडनला रवाना, नव्या चर्चांना उधाण

नियम न पाळणाऱ्यांवर सर्वात मोठी कारवाई, ॲम्बुलन्समध्ये बसवून कोरोना…पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More