बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

क्रीडा विश्वावर शोककळा! भारताच्या दोन सुवर्णपदक विजेत्या ऑलिम्पिकवीरांचं कोरोनामुळे निधन

नवी दिल्ली | माजी भारतीय हॉकीपटू आणि प्रशिक्षक एमके कौशिक या दोन दिग्गज हॉकीपटू आणि ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंचं कोरोनामुळे निधन झालं आहे. त्यामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरली असून भारतीय हॉकीसाठी 8 मे म्हणजेच आजचा दिवस सर्वात वाईट दिवस ठरला आहे.

भारताच्या ऑलम्पिक सुवर्णपदक विजेत्या संघाचे सदस्य राहिलेल्या एमके कौशिक यांना दिल्लीतील एका नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांची परिस्थिती गंभीर होती. तब्येतीत आणखी बिघाड झाल्यानं त्यांना वेंटिलेटवर ठेवण्यात आलं होतं. मात्र कौशिक यांनी वयाच्या 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 1980 सालच्या मॉक्सो ऑलम्पिकमधील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. भारतासाठी हे ऑलम्पिकमधील शेवटचं सुवर्णपदक ठरलं होतं

माजी हॉकीपटू रविंदर पाल सिंह यांचंही कोरोनामुळे निधन झालं. वयाच्या 65 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांची मागील 2 आठवड्यांपासून कोरोनाशी लढत होते मात्र आज त्यांची झुंज अपयशी ठरली आणि कोरोनामुळे त्यांचं निधन झालं आहे. पाल देखील 1980 च्या मॉस्को ऑलिम्पिकच्या सुवर्ण पदक संघाचे सदस्य होते.

दरम्यान, कौशिक यांच्यासोबत त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावरही याच नर्सिंग होममध्ये उपचार सुरू आहेत. कौशिक यांचं भारतीय हॉकी संघात महत्वाचं स्थान होतं. शिक भारताच्या सिनिअर पुरूष आणि महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक देखील राहिले आहेत. 2002 साली त्याच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात भारतीय हॉकी संघानं कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्ण पदक मिळवलं होतं.

 

थोडक्यात बातम्या- 

अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीने देश कोरोनामुक्त होण्यासाठी ठेवले पूर्ण रोजे

‘जिद्द म्हणजेच शरद पवार, दुसरं काही नाही’; राऊतांनी घेतली पवारांची भेट

कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा- देवेंद्र फडणवीस

‘माझ्या सूनेचे क्रिकेटर इरफान पठाणसोबत अनैतिक संबंध’; निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचे गंभीर आरोप

कोरोनाबाधित रुग्णाला एका दिवसात बरं केल्याचा दावा, डॅाक्टरवर गुन्हा दाखल

‘हिन्दुस्तानी भाऊ’ला पोलिसांनी घेतलं ताब्यात, जाणून घ्या कारण; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More