बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, पण सक्रीय कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात

नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांची (India Corona) संख्या गेल्या काही महिन्यात सतत वाढत असताना आता हळूहळू ही रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस मोठ्या घट होत आहे. त्यामुळे दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. पण गेल्या 24 तासातील देशातील कोरोनाबाधितांची (Corona Update) आकडेवारी ही काही प्रमाणात चिंता वाढवणारी आहे.

गेल्या 24 तासात देशभरात 10 हजार 549 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता आटोक्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत होतं पण ही गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, सध्या देशभरात 1 लाख 10 हजार 133 सक्रिय कोरोनाबाधित (Active Corona Patient) रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर मागच्या 24 तासात 488 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याने अनेक कुटूंब उध्वस्त झाले आहेत.

देशभरात लसीकरण मोहीम (Vaccination Drive) मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून भारताने 100 कोटींचा विक्रमी टप्पा पार केला. तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

देशात सतर्कतेचं वातावरण, परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर राहणार विशेष लक्ष

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटला WHO नं दिलं ‘हे’ नाव, शास्त्रज्ञांकडून धोक्याची घंटा

‘कोई सहरी बाबू दिल-लहरी बाबू हाय रे’ गाण्यावर रोहित, श्रेयश आणि शार्दुलचे जोरदार ठुमके, पाहा व्हिडीओ

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंना उच्च न्यायालयाचा दणका; दिले ‘हे’ आदेश

नाना पटोले यांनी गडकरींविरोधात दाखल केलेल्या याचिकेबाबत ‘ही’ माहिती आली समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More