बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत चढ-उतार सुरूच, वाचा आकडेवारी

नवी दिल्ली | देशातील कोरोना रूग्णसंख्येत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशात वेगानं लसीकरण सुरु करण्यात आलं. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशातच देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. त्यात गेल्या 24 तासात देशातील सक्रीय बाधितांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे.

गेल्या 24 तासात भारतात 15 हजार 823 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 226 रुग्णांना प्राण गमवावे लागले. काल दिवसभरात देशात 22 हजार 844 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. देशभरात सध्या 2 लाख 07 हजार 653 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत देशभरात 04 लाख 51 हजार 189 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत होती पण आता हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, भारतात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 96 कोटी 43 लाख 79 हजार 212 नागरिकांचं लसीकरण झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. तसेच लसीकरण मोहीम संपुर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

संजय राऊतांचा बैठकींचा सपाटा; पुण्यात मोर्चेबांधणीला केली सुरूवात

या भाजपच्या नेत्यांवरील आरोपाचं पुढे काय झालं? राष्ट्रवादीचा पोस्टर्समधून किरीट सोमय्यांना सवाल

म्युझिक स्कूलची फी भरण्यासाठी तरुणाची रस्त्यावर कसरत, पाहा व्हिडीओ

“पीएम केअर फंडच्या संकेतस्थळावरून मोदींचा फोटो हटवा”

किरीट सोमय्यांचा पुन्हा मुश्रीफांवर हल्ला; म्हणाले, आज दुपारी 1 वाजता…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More