बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोना रूग्णसंख्येत मोठी घट, वाचा आकडेवारी एका क्लिकवर

मुंबई | संपूर्ण राज्यभरात कोरोना महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु ही रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 906 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 918 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात 15 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 11 हजार 704 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत . त्याचबरोबर आतापर्यंत 66 लाख 28 हजार 744 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 64 लाख 72 हजार 681 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 40 हजार 707 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात 6 कोटी 44 लाख 89 हजार 471 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

आदित्य ठाकरेंसाठी वरळीची जागा सोडणाऱ्या उमेदवाराला शिवसेना देणार मोठं गिफ्ट?

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव! ‘या’ हिट गाण्याचा केला रिमेक

“पण हे कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार”

Mr 360 चं वर्तुळ पुर्ण; महान खेळाडू एबी डिव्हिलीयर्सची क्रिकेटमधून निवृत्ती

“अन्नदात्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हणल्याबद्दल नरेंद्र मोदींनी माफी मागावी”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More