बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात जानेवारीनंतर सर्वात कमी रूग्णांची नोंद

नागपूर | महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने वाढत होती. परंतु, हळूहळू ही रुग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातून आता दिलासादायक आकडेवारी समोर येत आहे.

नागपूर जिल्ह्यात सोमवारी अवघ्या 09 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. नागपूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासुन एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत 9 हजार 038 कोरोनाबाधितांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्युु झाला आहे. जानेवारीपासुन पहिल्यांदाच सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद नागपूरमध्ये करण्यात आली आहे.

नागपुरमधील कोरोना हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. सध्या नागपूर हे कोरोनामुक्त होत असलं तरीही प्रशासनातर्फे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तसेच नागरिकांना कोरोना नियम पाळण्यासंदर्भात वारंवार सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये नागरिकांना लॉकडाऊनमधून शिथिलता देण्यात येत आहे. तसेच पाच टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातील अनलॉकला सुरुवात झाली आहे. दर आठवड्याला जिल्ह्याचा आढावा घेऊन संबंधित जिल्ह्याचे स्तर प्रशासनातर्फे ठरवण्यात येत होते. पण आता कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस या व्हायरसने डोकं वर काढलं असताना पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

थोडक्यात बातम्या –

शाब्बास पुणेकरांनो! कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या पुण्याने अखेर करुन दाखवलं, वाचा आजची आकडेवारी

राज कुंद्राच्या समर्थनार्थ उतरली गहना; एकता कपूरचं नाव घेत म्हणाली…

अभिनेत्रींना ‘हे’ आश्वासन देऊन करुन घ्यायचे बोल्ड सीन्स, मुंबई पोलिसांचा धक्कादायक खुलासा

शेळीनं 8 पायांच्या पिल्लाला दिला जन्म मात्र अवघ्या पाच मिनिटानंतर…

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More