बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Corona: राष्ट्रवादी काॅंग्रेस खासदार सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

मुंबई | कोरोनानं (Corona) जगभरात कहर माजवला आहे. कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. अनेकांना कोरोनाची लागण होत असलेली पहायला मिळत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (NCP MP Supriya Sule) आणि त्यांचे पती सदानंद सुळे (Sadanand Sule) यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

कोरोनाची लागण झाल्याची माहिती सुप्रिया सुळे यांनी स्वतः ट्विट करुन दिली आहे. मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी, ही नम्र विनंती. काळजी घ्या, असं ट्विट करत सुप्रिया सुळे यांनी लागण झाल्याची माहिती दिली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानही अनेक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला. विधानसभेतील तब्बल 32 जणांना कोरोनाची लागण झाली होती.

दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्राॅननं राज्यात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“…हे आम्ही बघू, बाहेरच्यांनी नाक खुपसायची गरज नाही”

‘…माझ्यावर दबाव आणला जाऊ शकत नाही’; मुख्यमंत्र्याच्या पत्रावर राज्यपालांची नाराजी

‘…अन्यथा अजून कडक निर्बंध लावले जातील’; राजेश टोपेंचा गंभीर इशारा

विदर्भात आजही पावसाची शक्यता, ‘या’ भागात यलो अलर्ट जारी

मोठी बातमी! भाजप आमदार नितेश राणेंना न्यायालयाचा मोठा झटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More