बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात गेल्या 24 तासांत नव्या कोरोनाबाधित रूग्णांचा धक्कादायक आकडा

नवी दिल्ली |   भारतात नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाच्या रूग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. गेल्या आठवड्यात ही वाढ आठ ते नऊ हजारांपर्यंत होती मात्र गेल्या 24 तासांत कोरोनाच्या तब्बल 10 हजार नव्या रूग्णांच्या नोंद झाली आहे.

बुधवारी 9 हजार 304 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. तर गुरूवारी ती संख्या वाढून 9 हजार 851 झाली होती. मात्र शुक्रवारी कोरोनाने आतापर्यंतचा सर्वांत उच्चांक गाठला आहे. एकाच दिवशी भारतात पहिल्यांदाच 10 हजार रूग्ण आढळून आले.

गेल्या पंधरा दिवसांमध्ये कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असून देशभरात एकूण रुग्णांची संख्या 2 लाख 26 हजार 770 झाली आहे. त्यापैकी 1 लाख 9 हजार 662 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या चोवीस तासांमध्ये 5 हजार 535 रुग्ण बरे झाले. एकूण मृत्यू 6 हजार 348 झाले असून गेल्या चोवीस तासांमध्ये 273 मृत्यू झाले, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी दिली.

गेल्या 24 तासांमध्ये तमिळनाडू, महाराष्ट्र, दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर, केरळ आणि आसाम या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णवाढ झाली. महाराष्ट्रानंतर दिल्लीत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

FACT CHECK | एकदा कपूरविरोधात भारतीय सैन्यदलानं खरोखर गुन्हा दाखल केलाय का?

अमेरिकेनंतर आता ‘हा’ देश ठरतोय कोरोनाचं नवं हॉटस्पॉट; अक्षरशः थैमान सुरु

महत्वाच्या बातम्या-

शिवराज्याभिषेक दिनासंदर्भात आक्षेपार्ह ट्विट केल्याचा आरोप; पुण्यात भाजप नेत्याविरोधात तक्रार

विद्यार्थी देशाचे भविष्य, कोणत्याही परिस्थितीत त्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही- बच्चू कडू

अजित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर, ‘लवकरात लवकर मदत देतो’ शेतकऱ्यांना शब्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More