बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची सर्वत्र दहशत, केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

नवी दिल्ली | कोरोनाने संपुर्ण जगभरात थैमान घातलं असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातच कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने देशाची चिंता वाढवली आहे. एकीकडे कोरोना आटोक्यात आला असताना रुग्णसंख्येतही घट झाल्याचं पाहायला मिळत होतं. परंतु दक्षिण आफ्रिका, हाॅंगकाॅग आणि बोत्सवाना येथे सापडलेल्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत नव्या व्हायरसचा म्युटेशन (Corona Mutation) मिळाला आहे. तसेच कोरोनाचे आतापर्यंत 100 जिनोम सिक्वेंस सापडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चिंता व्यक्त केली जात आहे. नवा म्युटेशन व्हायरस हा नेमका कितपत धोकादायक आहे याबाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही.

केंद्र सरकार या नव्या व्हेरिएंटमुळे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच केंद्राने देशातील सर्वच राज्यांना पत्र लिहून सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे. तसेच देशातील सर्व विमानतळांवर (Airport) कडक तपासणीचे आदेशही त्यांनी दिले आहेत. हा नवा व्हेरिएंट (New Varient) किती धोकादायक आहे हे अद्याप जरी अस्पष्टच असलं तरी नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, मानवी शरिराच्या इम्यून सिस्टिमवर (Immune System) याचा परिणाम होईल, असं बोललं जात आहे पण अधिकृतरित्या याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. देशात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची (International Passenger) आता कडक तपासणी होणार आहे, शिवाय दक्षिण आफ्रिका, हाॅंगकाँग आणि बोत्सवाना येथुन येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.

थोडक्यात बातम्या

कोल्हापूरचा गडी बिनविरोध जिंकला! पाटील यांचा मार्ग मोकळा

“…मग संविधान पाळण्याचं नाटक कशासाठी?”, राऊतांचा खोचक सवाल

लॉजमध्ये नग्नावस्थेत आढळले जोडप्याचे मृतदेह अन् उडाली खळबळ

“…तर त्याला बाॅक्सिंग रिंगमध्ये घेऊन चांगलाच झोडपला असता”

विलिनीकरण मान्य झालं नाही तर काय?, अनिल परब म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More