बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Corona: लसीकरण प्रमाणपत्राची गरज नाही, आता हातातच…

नवी दिल्ली | कोरोना (Corona) महामारीनं जगभराचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर या टेन्शनमध्ये आणखीनच वाढ केली आहे. यातच ओमिक्राॅन (Omicron) या नवीन व्हेरियंटनं आता थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळे लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे.

कोरोना काळात आता कुठेही जायचं म्हटलं की लस घेणं अनिवार्य झालं आहे. त्यामुळे कुठेही गेलं तरी लस घेतली याचं प्रमाणपत्र (Certificate) दाखवायला लागतं. पण आता प्रमाणपत्र दाखवायची गरज लागणार नाही. कारण आता तर तुमचं लसीकरण झालं आहे, हे दाखवणारी मायक्रोचीपही तयार झाली आहे.

अत्यावश्यक सेवांसाठी लस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवणं सक्तीचं करण्यात आलं आहे. नागरिकांनी लस घेतली आहे की नाही, हे तपासण्यासाठी (Vaccination Status) स्वीडनमध्ये एक संशोधन करण्यात आलं आहे. या संशोधनातून मायक्रोचीपचा अविष्कार करण्यात आला आहे. स्कॅनेबल मायक्रोचिप तयार केली आहे. ही मायक्रोचिप हातामध्ये बसवली जाईल. ही चीप स्कॅन (Scannable Microchip) केल्यानंतर संबंधित व्यक्तीने लस घेतली आहे की नाही हे कळेल

दरम्यान, या मायक्रोचीपमुळे तुम्हाला लसीकरण प्रमाणपत्र सोबत बाळगण्याची गरज पडणार नाही. ही चिप बसवण्याचा खर्च 100 युरो असून फोनवर स्कॅन केल्यानंतर ती आपलं लसीकरण स्टेटस दर्शवते. या चिपच्या माध्यमातून युरोपियन डिजिटल कोरोना प्रमाणपत्र PDF स्वरूपात दाखवलं जातं.

थोडक्यात बातम्या – 

महात्मा गांधींविरोधात गरळ ओकणाऱ्या कालीचरणला अखेर अटक!

“राज्य सरकारमधील नेत्यांना घोटाळेभूषण, घोटाळेवैभव, घोटाळेसम्राट पुरस्कार दिले पाहिजे”

नितेश राणेंच्या अडचणी वाढल्या, न्यायालयाचा दिलासा नाहीच!

“भाजपला मत द्या आणि 200 रुपयांची दारू 50 रुपयांना न्या”

नारायण राणेंना पोलिसांकडून नोटीस; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More