बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात तब्बल ‘इतक्या’ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद!

मुंबई | राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्यात पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे.

दिवसभरात राज्यात तब्बल 56 हजार 286 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला  मिळालं, आज 376 रूग्णांचा राज्यात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यू दर झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत असताना आज हे गंभीर चित्र पाहायला मिळालं. त्याचबरोबर राज्यात सध्या एकूण 5 लाख 21 हजार 317 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात विकेंड लाॅकडाऊन घोषित केला, पण  तरी लोक नियमांचं पालन करून सरकारला सहकार्य करताना दिसून येत नाहीत, परिणामी महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

संपुर्ण महाराष्ट्रासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे.  दिवसभरात पुण्यातुनही काही प्रमाणात धक्कादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 7 हजार 010 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार की अशीच रूग्णसंख्या वाढत जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोना लस घेणाऱ्यांसाठी खुशखबर; उबर कंपनी देणार फ्रि राईड

रेमडेसिवीर इंजेक्शन संदर्भात आरोग्यमंत्र्यांचे उत्पादक कंपन्यांना ‘हे’ महत्वाचे आदेश

कोरोनाची लस घेण्याआधी ‘या’ 5 गोष्टी आवर्जून टाळा; डॉक्टरांच्या महत्त्वाच्या सूचना

चिंता वाढली… पुण्यात नव्या कोरोनाबाधितांमध्ये विक्रमी वाढ!

पुण्यातील कोरोना बेड्स आणि व्हेंटिलेटरची आकडेवारी जाणुन घ्या एका क्लिकवर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More