बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात लहान मुले कोरोनाबाधित होण्याचं प्रमाण झपाट्याने वाढलं

उस्मानाबाद | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण महाराष्ट्रभरात हाहाकार माजवला होता. तसेच महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या आता हळूहळू आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. पण उस्मानाबाद जिल्ह्यात मात्र चिंताजनक वातावरण पसरलं आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात लहान मुलांना मोठ्या प्रमाणात कोरोना होत असल्याचं उघडकीस आलं आहे. 18 वर्षाच्या खालील मुलांना कोरोनाची बाधा होत असल्याने प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच जिल्ह्यात सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यातील लोहारा तालुक्यात धानोरी आणि तुळजापूर तालुक्यातील हंगरगा येथे कोरोनाचा अक्षरशः विस्फोट झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. धानोरी येथे एकाच दिवसात 37 तर हंगरगा येथे एका दिवसात 11 कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसेच धानुरी येथे सापडलेल्या 37 रुग्णांपैकी 13 रुग्ण ही 18 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 624 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून लोहारा व तुळजापूर तालुक्यातील दोन गावांमध्ये कोरोनाचा अचानक विस्फोट झाल्याचं समोर आल्याने प्रशासन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्रातील कोरोनाचं हाॅटस्पाॅट ठरलेल्या ‘या’ जिल्ह्यात आज अवघ्या 02 कोरोनाबाधितांचा मृत्यू

देवाची सावली! उद्यान एक्सप्रेससमोर झोपून देखील महिला जिवंत

सेमी फायनलचा वचपा काढण्यासाठी विराटसेना सज्ज; 11 शिलेदारांची यादी जाहीर!

आजोबा अरुण गवळीचा नातीला खेळवताना फोटो व्हायरल!

मोठी बातमी! सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांच्या निकालाची तारीख जाहीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More