बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरात इतक्या रुग्णांची नोंद

पुणे | पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत आहेत. पुण्यात कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढत असल्याचं चित्र आहे. आजची कोरोना रुग्णांची आकडेवारी धक्कादायक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 6 हजार 225 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 3 हजार 762 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 52 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 11 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 901 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2,90,044 इतकी आहे. तर पुण्यात 41 हजार 940 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 5 हजार 452 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2,42,652 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 17 हजार 774 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आणि उद्यापासुन पुण्यात मिनी लाॅकडाऊन लावण्यात येणार असल्याची घोषणा आज पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. तुर्तास हा निर्णय पुढच्या 7 दिवसांसाठी घेण्यात आला असला तरी येणाऱ्या काळात परिस्थिती पाहुन त्यात वाढ केली जाऊ शकते.

थोडक्यात बातम्या – 

“टीव्ही चॅनलवाल्यांनी पश्चिम बंगाल तामिळनाडूतील गर्दीचे शॉट महाराष्ट्रात दाखवत बसू नये”

कोरोनाची परिस्थिती भयंकर, सरकारला सहकार्य करा- देवेंद्र फडणवीस

वाघ्याला बांधून ठेवून मुरळीवर सामुहिक बलात्कार, धक्कादायक घटनेनं महाराष्ट्र हादरला!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा थेट राज ठाकरेंना फोन, केली ‘ही’ महत्त्वाची विनंती

अभिनेत्री राजेश्वरी खरातचा ‘तो’ हॉट व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांना लावलंय अक्षरशः वेड

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More