बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात कोरोनाचा उद्रेक, 24 तासात 10 जणांचा मृत्यू, 995 पॉझिटिव्ह!

नागपूर | महाराष्ट्रात सध्या कोरोना पुन्हा डोकं वर काढत आहे. अशातच अनेक जिल्ह्यात संचारबंदीसह कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा त्याशिवाय आता उपाय नाही, असं आवाहन प्रशासनातर्फे नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही जण नियमांची पायामल्ली करतांना दिसत आहेत, आणि परिणामी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे.

महाराष्ट्रात आता अमरावती, अकोला, यवतमाळपाठोपाठ नागपूरमध्येही कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. मागच्या 24 तासात नागपूरमध्ये 995 नवीन कोरोना रूग्ण आढळून आले आहे, तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र, मागच्या 24 तासात अचानक कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात 11 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने शहरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. यामुळे शालेय परीक्षेचं नियोजन आणि आरटीई प्रवेश प्रक्रियाच्या कामावर याचा परिणाम होण्याची दाट शक्यता दिसत आहे.

दरम्यान, मागच्या 24 तासात 578 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर नागपूरमध्ये तब्बल 8844  कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यासोबतच, इंदोरा, कळमना स्वावलंबीनगर, जरीपटका, लक्ष्मीनगर, गणेशपेठ, बजाजनगर आणि खामला हे नागपूरचे हाॅटस्पाॅट बनले आहे. यामुळे नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि मास्कचा वापर करा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

महाराष्ट्राची मान शरमेनं खाली घालणारी घटना, चक्क पोलिसांचाच सहभाग असल्यानं मोठी खळबळ

शिवसेना नेत्यानं शिवसेनेच्याच मंत्र्यावर गंभीर आरोप केल्यानं खळबळ

वाहन चालवण्याची हौस महागात; मुलाचा मृत्यू आणि आईवर गुन्हा दाखल

मुंबईत जाण्यास मला भीती वाटते; आता कंगणा रनौत केली ‘ही’ मागणी

तो व्यक्ती कोण?, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेल्या किस्स्याची जोरदार चर्चा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More