बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात नव्याने 86 कोरोनाबाधित रूग्णाची नोंद; बाधितांचा आकडा पोहचला दीड हजारापार!

पुणे | पुणे शहरात गुरूवारी नव्याने 86 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 1 हजार 518 झाली आहे. तर 44 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले असून 4 जणांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात आजतागायत 14 हजार 593 व्यक्तींच्या कोरोना तपासण्या झाल्या असून त्यातील 1 हजार 700 व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. त्यातील 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 1 हजार 755 व्यक्ती विलगीकरण कक्षात आहे, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

सर्वतोपरी प्रयत्न करुनही पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे आता पुण्यात सोशल डिस्टन्सिंगचं कोटकोरपणे पालन व्हावं यासाठी पुन्हा काही अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले आहेत. पुण्यातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवस अतिरिक्त निर्बंध राहणार आहेत. 1 मे रोजी सकाळी सहा वाजल्यापासून 3 तीन मेपर्यंत रात्री 24 वाजेपर्यंत हे अतिरिक्त निर्बंध असणार आहेत.

गुलटेकडी, महर्षीनगर झोपडपट्टी परिसर, डायस प्लॉट, इंदिरानगर, नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रोड, मोदीखाना कुरेशी मस्जिद, भीमपुरा लेन, बाबाजान दर्गा, शिवाजी मार्केट शितलादेवी मंदिर, ताडीवाला रस्ता, बालाजीनगर, पर्वती दर्शन परिसर, लक्ष्मी नगर, गाडीतळ, चित्रा चौक परिसर या भागात अतिरिक्त निर्बंध लावण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यातील ‘या’ भागात तीन दिवसांसाठी पुन्हा अतिरिक्त निर्बंध; किराणा, भाजीपाला बंद

“कोरोनावर औषध सापडलं”; पाहा कुणी केलाय ‘हा’ दावा

महत्वाच्या बातम्या-

“महाराष्ट्र पोलिसांवर हल्ले होतायेत आणि गृहमंत्री विचारतायत विरोधी पक्ष काय करतोय?”

अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; लाखो डॉलर्सची मदत करणार

राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो – देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More