देश

चार दिवस रोज फक्त दोन गोळ्या; कोरोनामुक्त झाली महिला डॉक्टर

लखनौ | मुंबईत दुसरा आणि बिहारमध्ये पहिला कोरोनाचा बळी गेल्याने देशातील मृत्यूंची संख्या 6 वर पोहोचली आहे. अशातच आज कॅनडावरून भारतात आलेली महिला डॉक्टर कोरोनापासून बरी झाली आहे.

डॉक्टरला लखनौच्या केजीएमयूमधून घरी सोडण्यात आले आहे. तरीही तिला 14 दिवस होम क्वारंटाईन करण्यास सांगितले आहे. महत्वाचे म्हणजे या महिला डॉक्टरला कोणत्याही प्रकारचे अँटीबायोटिक औषध देण्यात आलेले नाही. नाही कोणती परदेशातली महागडी औषधे, इंजेक्शने.

त्यांना केवळ चार दिवस स्वाईन फ्लूवर दिली जाणारी टॅमी फ्लू सकाळी आणि संध्याकाळी एकेक अशी देण्यात आली. एवढ्या गोळ्यांतच ही डॉक्टर बरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोना व्हायरसही एक प्रकारचा फ्लूच आहे. केवळ त्याचा प्रभाव जास्त आहे. साध्या फ्लूमध्ये आपली रोग प्रतिकारशक्तीच पुरेशी असते. अशीच शक्ती कोरोनाशी लढण्यासाठी पुरेसी आहे. यामुळे घाबरण्याचे कारण नाही. तरुण असाल तर घाबरण्याची गरज नाही. मात्र, सावध रहावं लागेल. वरिष्ठ नागरिकांची थोडी काळजी घ्यावी लागेल, असं केजीएमयूमध्ये महिलेवर उपचार करणाऱे डॉक्टर सुधीर वर्मा यांनी सांगितलंय.

ट्रेंडिंग बातम्या-

अभिनेत्री पूजा बेदीने खिल्ली ‘जनता कर्फ्यू’ची उडवली खिल्ली; म्हणाली…

‘जनता कर्फ्यू’चे दिवस वाढवणार; संजय राऊतांनी दिले संकेत

महत्वाच्या बातम्या-

मी घरातूनच काम केलं, तुम्हीही करा- प्रमोद सावंत

रेल्वे आणि लोकल पाठोपाठ एसटी देखील बंद राहणार?

काँग्रेस खासदाराचा मोदींच्या जनता कर्फ्यूला पाठींबा; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या