बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना’बाधितांच्या मृतदेहाबाबत पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

पुणे | राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या आठवढ्यापासून मोठ्या संख्येने वाढत आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यामध्ये मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्तांची संखेत वाढ होताना दिसत आहे. अशातच पुणे विभागात ‘कोरोना’बाधिताचा रुग्णाचे निधन झाल्यास त्याचा मृतदेह कुटुंबीयांना दिला जाणार नाही, असा मोठा निर्णय पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी घेतला आहे.

जर मृतदेह दफन करायचा असल्यास शहरापासून दूर अंतरावर सहा फूट खोल खड्डा खणावा लागेल. त्यामध्ये निर्जंतुक लिक्विड टाकून मृतदेह प्लास्टिकच्या दोन बॅगांमध्ये ठेवून दफन केला जाईल.

कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यात सर्वाधिक कोरोनाग्रस्त दगावले आहेत. याच पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुणे विभागातील सर्व जिल्हाप्रमुखांना कोरोना रुग्णांच्या अंत्यसंस्काराविषयी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, पुण्यात कोरोना विषाणू प्रादुर्भावाविरोधात सुरु असलेल्या लढ्यात सिम्बॉयोसिस पाठोपाठ आता भारती हॉस्पिटलही सहभागी झाले असून उपचारांसाठी आता भारती हॉस्पिटल उपलब्ध झाले आहे. यात 135 विलगीकरण आणि15 अतिदक्षता बेड्स उपलब्ध झाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी घेतला सेल्फ क्वारंटाईनचा निर्णय

कोरोनाआधी आम्ही उपासमारीने मरू,आम्हाला मदत करा- इम्रान खान

महत्वाच्या बातम्या-

“शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?”

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले इतके कोटी रुपये

कुठलीही महाविद्यालयीन परीक्षा रद्द होणार नाही, परीक्षा होणारच- उच्च-तंत्रशिक्षण मंत्री

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More