सोलापूर | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, कोरोना संसर्ग आटोक्यात आणणं शक्य होत नाहीये. अशात आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
सोलापुरात सुद्धा 31 ते 50 वयोगटातील लोक कोरोनाच्या विळख्यात येत असल्याचं समोर आल आहे. कामानिमित्त 31 ते 50 वयोगटातील लोकच घराबाहेर पडत असल्याने, या वयोगटातील लोकांना संसर्ग होण्याचा जास्त धोका असल्याचं आता समोर आलं आहे.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात दहा मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. यंदाच्या जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात शहर आणि जिल्ह्यांत चार हजार 564 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर मार्च महिन्यातील 10 ते 26 मार्च या सतरा दिवसांमध्ये तब्बल 5079 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे प्रशासन आता पुन्हा कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कामाला लागले आहेत. राज्यात शुक्रवारी दिवसभरात कोरोनाचे तब्बल 36,902 नवे रुग्ण आढळले आहेत. मृतांचा आकडासुद्धा शंभरी पार गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे 112 जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात रविवारी रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सुचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
थोडक्यात बातम्या-
“ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर उभं आहे, हे लक्षात असू द्या”
बाप रे बाप! टीम इंडियाचा जबरा फॅन, वनडे सामना पाहण्यासाठी चक्क ‘या ठिकाणी’ जाऊन बसला
‘तुझपे कोई गम की आंच आने नहीं दूं!’; जिवाची बाजी लावून वाचवला तिरंगा
आग विझवून घरी जात असताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू!
“फुकटात मंत्रिपद मिळालेल्या आव्हाडांची उगाच वळवळ सुरूये, कोणाची एजंटगिरी करताय?”
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.