महाराष्ट्र मुंबई

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी चिंताजनक

Photo Credit-Pixabay

मुंबई | देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. मात्र अशातच रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढून लागल्यानं चिंतेत वाढ झाली आहे.

शनिवारी देशात 13 हजार 993 म्हणजेच जवळपास 14 हजार रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. याआधी 29 जानेवारीला 18 हजार 855 रुग्ण आढळून आले होते. यानंतर शनिवारची रूग्णसंख्या सर्वाधिक आहे.

देशात सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात आढळून येत आहे. शनिवारी राज्यात 6 हजार 281 नवे रुग्ण आढळले आहेत. मागील दहा दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाली आहे.

कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. यात महाराष्ट्र, केरळ, पंजाब, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड यासारखी राज्य आघाडीवर आहेत.

मुंबईत 1 फेब्रुवारीपासून लोकलचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले केले गेले आहेत. मात्र, याठिकाणी सुरक्षा निर्बंधांच्या अंमलबजावणीत हलगर्जीपणा होत असल्यानं रुग्ण वाढ झपाट्यानं होत असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

FASTag मध्ये पैसे असतानाही टोलनाक्यावर स्कॅन नाही झालं तर… नक्की वाचा ‘हा’ मोठा नियम

‘माझा फोन टॅप होतोय…’; जितेंद्र आव्हाडांच्या त्या ट्वीटनं खळबळ

“भारताच्या इतिहासात जे कधीही घडलं नाही, ते आता मोदी सरकारच्या कारकिर्दीत घडणार”

तुम्ही तेव्हाच आमच्याशी लव्ह मॅरेज केलं असतं तर…- गुलाबराव पाटील

सावधान!! कोरोनासंदर्भात अफवा पसरवाल तर… प्रशासनानं नागरिकांना दिला इशारा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या