बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच, वाचा आजची आकडेवारी

मुंबई | संपूर्ण राज्यभरात कोरोना (Corona) महामारीने थैमान घातलं होतं. त्यातच कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनेही महाराष्ट्रभर हाहाकार माजवला होता. परंतु ही रुग्णसंख्या हळूहळू आटोक्यात येत असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

आज दिवसभरात संपूर्ण महाराष्ट्रात 664 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची (Corona Patient) नोंद झाली असून 915 कोरोना रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. तसेच दिवसभरात 16 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

सध्या संपूर्ण महाराष्ट्रात 7 हजार 132 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण (Active Corona Patient) उपचार घेत आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 66 लाख 37 हजार 289 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 64 लाख 85 हजार 335 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त (Corona Free) होऊन घरी परतले आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत 1 लाख 41 हजार 065 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू (Corona Death) झाल्याची आकडेवारी स्पष्ट करण्यात आली आहे. तसेच संपूर्ण राज्यात 6 कोटी 58 लाख 39 हजार 692 जणांची कोरोना चाचणी (Corona Test) करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबई कोरोना अपडेट! जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

योगी सरकारचा गजब कारभार! उद्घाटनात नारळ फोडायला गेले अन् रस्ताच फुटला

“अरे निर्लज्जांनो तुम्हाला लाज वाटली पाहिजे, त्यांच्या नखाची सरही तुम्हाला नाही”

“बिनडोक लोक सत्तेत बसल्यावर अजून काय अपेक्षा करणार”

भाजप-शिवसेनेचे नगरसेवक भिडले, सभागृहात जोरदार घोषणाबाजी अन् तू तू मै मै

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More