पुणे | कोरोनाचा धोका जरी वाढत असला तरी पुणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. 10 कोरोनाग्रस्त रूग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी दिली आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर माहिती दिली.
पुण्यातल्या नायडू रूग्णालयात बाधितांवर उपचार सुरू आहेत. तर काही संशयित देखील देखरेखीखाली असल्याचं आयुक्तांनी सांगितलं आहे. पुणेकरांनी आवश्यक ती खबरदारी घेणं गरजेचं आहे. विनाकारण गर्दी टाळावी, असंही आवाहन त्यांनी केलंय.
शासनाने जी मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत त्या तत्वांचं सगळ्यांनी पालन करावं आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी. तसंच वसतिगृह सुरू ठेवण्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने निर्णय घ्यावा. विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी अनावश्यक फिरू नये. ज्यांच्या परीक्षा नाहीत त्या विद्यार्थ्यांनी घरातच थांबावं, असं आयुक्तांनी सांगितलं.
दरम्यान, परदेशातून पुण्यात येणाऱ्यांवर देखरेख ठेवणार आहे. तसंच परराज्यातील विद्यार्थ्यांनी सध्या पुण्यात येऊ नये, अशी विनंतीही त्यांनी यावेळी केली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
“केंद्रात गो-गो म्हणून बघा कधी तुमचा खो-खो करतील तुम्हाला पण नाही समजणार”
“मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा कणा शाबूत असेल तर त्यांनी नितीन राऊतांच्या विरोधात कारवाई करून दाखवावी”
महत्वाच्या बातम्या-
हनिमून झाल्यावर कळालं नवऱ्याला कोरोनाची लागण; पत्नी पळाली!
“काश्मिरची प्रगती करायची असेल तर राजकीय नेत्यांना नजरकैदेतून मुक्त करा; निवडणूक घ्या”
कोरोनामुळे ‘राज गर्जना’ होणार नाही; मनसेचा मेळावा रद्द
Comments are closed.