Top News देश

कोरोनाचा संसर्ग वाऱ्याच्या वेगाने पसरतोय; देशातली बाधितांची संख्या पोहचली 5 हजारांवर

नवी दिल्ली | लॉकडाऊन असून देखील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत कमालीची वाढ होतोना दिसून येत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 5 हजारांहून अधिक झाली आहे. ताज्या माहितीनुसार ही संख्या आता 5194 वर पोहचली आहे.

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. तर महाराष्ट्रातल्या मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले आहेत. महाराष्ट्रापाठोपाठ दिल्ली, आंध्रप्रदेश आणि केरळमध्ये सर्वाधिक रूग्ण आहेत.

देशातील कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या 149 आहे. तर महाराष्ट्रात देखील ही संख्या आता 64 वर जाऊन पोहचली आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात मृत्यूदर हा वाढलेला दिसून येत आहेत.

दरम्यान, 14 तारखेला केंद्र शासनाचा लॉकडाऊचा कार्यकाळ संपणार आहे. मात्र कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता हा लॉकडाऊन वाढवण्याची मागणी आता पुढे येऊ लागली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“मुंबई अडीच लाख कोटी केंद्राला देते, त्यातील 25 टक्के महाराष्ट्राला द्या”

358 तहसील आणि 44 हजार गावं तर एका गावाला किती शिवथाळी??; भाजपचा सवाल

महत्वाच्या बातम्या-

जितेंद्र आव्हाड तुझा दाभोलकर होणार; तरुणाच्या धमकीनं खळबळ

डोनाल्ड ट्रम्प यांचा सूर पालटला; आता म्हणतात, ‘नरेंद्र मोदी महान नेते!’

तरुण मारहाण प्रकरणी भाजपनं जितेंद्र आव्हाडांना विचारले ‘हे’ चार प्रश्न!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या