बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत कोरोनाबाधितांचा आकडा वाढला, वाचा गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी

मुंबई | महाराष्ट्रात सध्या कोरोनाचं संकट घोंगावत असल्याचं पाहायला मिळत आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असताना मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोरोनाबाधितांची आकडेवारी ही गेल्या काही दिवसात दिलासादायक असल्याचं समोर आलं होतं. पण आता हा आकडा पुन्हा एकदा हळुहळु वाढत असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 24 तासात एकूण 3 हजार 879 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच गेल्या 24 तासात 3 हजार 686 रुग्ण कोरोनामुक्त होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णसंख्या दिलासादायक असताना मागच्या 24 तासातील  आकडेवारी ही काही प्रमाणात वाढली असल्याचं चित्र सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये सध्या 51 हजार 472 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण असून, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांचा दर हा 90 टक्क्यांवर असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे. आतापर्यंत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील एकूण 5 लाख 98 हजार 545 रुग्ण कोरोनामधून बरे झाले आहेत.

रुग्ण वाढीचा दर हळूहळू कमी होईल असा विश्वास मुंबई महापालिकेकडून व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रासह मुंबईतील रुग्णसंख्या ही झपाट्याने कमी होत होती. पण मुंबईतील मागच्या 24 तासातील कोरोना रुग्णसंख्या ही  वाढली असल्याचं चित्र  दिसून येत आहे. तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील लाॅकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली आहे.

थोडक्यात बातम्या –

“आदु… तुझ्या पप्पांनी केंद्र सरकारकडून तुझ्यासाठी बायकोच मागायची सोडली फक्त”

एकाच तरुणीवर दोन गुंडांचं जडलं प्रेम, तरुणीने नकार दिल्यानंतर घडला धक्कादायक प्रकार

मुख्यमंत्र्यांच्या आजच्या संवादातील सर्व महत्त्वाचे मुद्दे वाचा एकाच ठिकाणी

“370 कलम हटवताना जी हिंमत दाखवली तीच हिंमत मराठा आरक्षणाबाबत दाखवा”

कुणाच्या भडकवण्याला बळी पडू नका, सरकार तुमच्यासोबत आहे- उद्धव ठाकरे

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More