औरंगाबाद | राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्या वाढत असल्याने आता रुग्णालयांची व्यवस्थाही कोलमडून पडत आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात कोरोना रुग्णांचे मोठे हाल सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी एक ट्वीट के लं आहे.
श्वेता महाले यांनी फोटोमध्ये एकाच बेडवर तीन रुग्ण, बेड अभावी रुग्णांवर फरशीवर झोपावं लागत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत ऑक्सिजनची नळी नाकाला लावून हे रुग्ण उपचार घेत असल्याचं या फोटोंमधून पाहायला मिळत आहे.
सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे. तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील. तसेच कोरानाच्या संकटामधून महाराष्ट्र लवकर मुक्त होईल. औरंगाबाद घाटी येथील ही आहे भयावह परिस्थीती, अशी टीका श्वेता महाले यांनी सरकारवर केली आहे.
दरम्यान, राज्यात बुधवारी 2021 मधील सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. आज दिवसभरात 31 हजार 855 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात 15 हजार 98 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर दिवसभरात 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात सध्या 2 लाख 47 हजार 299 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
सरकार वाचवण्यासाठी जेवढी धडपड महाआघाडी करत आहे तेवढीच धडपड सर्वसामान्य जनतेच्या जीव वाचविण्यासाठी केली तर जनतेचे अमूल्य जीव वाचतील तसेच कोरानाच्या संकटा मधून महाराष्ट्र लवकर मुक्त होईल.औरंगाबाद घाटी येथील ही आहे भयावह परिस्थीती….@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @rajeshtope11 pic.twitter.com/QKRVXEuK33
— MLA Shweta Mahale Patil (@MLAShwetaMahale) March 24, 2021
थोडक्यात बातम्या-
‘…तर तो सरळ सरळ लोकशाहीचा खून आहे’; शिवसेनेची मोदी सरकारवर टीका
मोठी बातमी! महाविकास आघाडीचे नेते घेणार राज्यापालांची भेट
मुख्यमंत्र्यांनी ‘दूध का दूध पानी का पानी’ करावं- अनिल देशमुख
होळी, धुलिवंदन आणि रंगपंचमीबाबत पुणे महापालिकेेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी!
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.