बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रुग्णांना होतोय ‘म्युकर मायकोसिस’ हा गंभीर आजार; 20 जणांचे डोळे निकामी

अहमदाबाद | देशभरात कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांवर विविध आजारांसह हार्ट अटॅक, लिव्हर स्ट्रोक, ब्रेन स्ट्रोक अशा आजारांना सामोर जावं लागत होत. याशिवाय सध्या आणखी एक नवा आजार या रुग्णांमध्ये आढळत आहे. गुजरातमध्ये डायबेटिस असलेल्या रुग्णांना ‘म्युकर मायकोसिस’ हा गंभीर आजार होत असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.

गुजरातमधील अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयामध्ये कोरोनाच्या 120 रुग्णांची नोंद आहे. म्युकर मायकोसिसमुळे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. म्युकर मायकोसिस हा नवा आजार आहे. याशिवाय अहमदाबादमध्ये 10 पेक्षा अधिक लोकांना कोरोनामुळे आपले डोळे गमवावे लागले आहेत. आता त्यामुळेच या आजाराची तुलना कॅन्सरशी केली जात आहे.

सुरतमध्ये आतापर्यंत 100 पेक्षा अधिक जणांना म्युकर मायकोसिस हा आजार झाला आहे. त्यामुळे 20 रुग्णांनी आपले डोळे गमावले आहेत. गुजरातमध्ये आतापर्यंत अशा 500 रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय गुजरातमधील वडोदरा आणि राजकोटमध्ये देखील म्युकर मायकोसिसची अनेक प्रकरणं समोर आली आहेत.

दरम्यान, या आजारात नाकात खाज सुटणे, त्वचा लाल होणे अशी लक्षणं दिसत आहेत. त्वचा लाल पडल्यानंतर लगेच उपचार सुरु न केल्यास  डेड स्किन होण्याचा धोका कमी आहे. हा आजार म्हणजे बुरुशीचा संसर्ग आहे. याचा सर्वाधिक परिणाम हा डायबेटिस रुग्णांमध्ये होतोय.

थोडक्यात बातम्या-

मी काही उत्कृष्ट काम करत नाही, सामाजिक दायित्व म्हणून मी पुढाकार घेतला – नितीन गडकरी

गायत्री मंत्राने कोरोना पळवणार?; मोदी सरकारचा नवा प्रयोग

“सकाळी ब्रश केल्यानंतर काहीही न खाता गोमूत्र प्या, तुम्हाला कोरोना होणार नाही”

राज्यातील ‘या’ 8 जिल्ह्यात कडक लाॅकडाऊन; फक्त या सेवा सुरू राहतील

“नितीन गडकरींकडे जबाबदारी देण्यामागची सुब्रमण्यम स्वामींची तळमळ समजून घ्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More