बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Corona: ‘मुंबईच्या बाहेरुन येणारी लोकं शिस्त बिघडवतात’; किशोरी पेडणेकर भडकल्या

मुंबई | दिवसेंदिवस कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढत चालला आहे. वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या पाहता आता प्रशासनाकडून कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे. अशातच मुंबईत तर कोरोनाची रुग्णसंख्या दुपटीनं वाढल्याचं चित्र आहे. त्यामुळे सरकारनं जमावबंदीचेही आदेश दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pendnekar) यांनीदेखील मुंबईकरांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. मुंबईकरांसाठी यंत्रणा सज्ज आहे, मात्र काळजी घ्यावी लागेल. विनामास्क घराबाहेर पडता कामा नये, असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांकडून शिस्त मोडली जात असल्याचं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. मास्क न वापरण्यांविरोधात क्लीन-अप मार्शलकडून सुरू असलेल्या कारवाईबाबत महापौरांनी म्हटले की, क्लीन-अप मार्शल यांनी मर्यादेत राहून काम करावे.

दरम्यान, मुंबईत गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. वाढता कोरोना आणि कोरोनाची वाढती रुग्णसंख्या याचा विचार करता मुंबईमध्ये 31st च्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

Corona : कोरोना होऊ नये म्हणून घेतले 4 डोस, तरीही शेवटी…

WHOनं वाढवलं जगाचं टेंशन; ‘कोरोनाची त्सुनामी येणार अन्…’

Corona: सर्वात पहिल्यांदा लस घेतलेल्या अभिनेत्रीला कोरोनाची लागण

मुंबईनंतर आता ‘या’ ठिकाणीही 31st च्या पार्ट्यांवर बंदी, वाचा काय आहेत नियम

Corona: लसीकरण प्रमाणपत्राची गरज नाही, आता हातातच…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More