बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जून-जुलैमध्ये कोरोना उच्चांक गाठेल आणि….- डॉ. रणदीप गुलेरिया

नवी दिल्ली | भारतात लॉकडाऊन होऊन जवळपास दीड महिना होत आला आहे. लॉकडाऊन असूनदेखील भारतात रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ही संख्या जून जुलैमध्ये उच्चांक गाठेल, असा अंदाज एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी वर्तवला आहे.

सध्या जी आकडेवारी समोर येत आहे त्यानुसार जून जुलैमध्ये सर्वाधिक कोरोनाचं संक्रमण होईल आणि त्यानंतर ही साथ हळूहळू कमी होत जाईल, अशीही शक्यता डॉ. रणदीप गुलेरिया यांनी व्यक्त केली आहे. इंडिया टुडेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

जागतिक महासाथ किती काळ राहिन, याचं भाकित करणं सध्या अशक्य आहे. मात्र उपाययोजना केल्यास ती संख्या देखील हळू हळू कमी होईल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.

शासनाने कोरोना हॉटस्पॉट कसे कमी होतील, यावर काम करणं गरजेचं आहे. प्रशासनाने कोरोना हॉटस्पॉटची संख्या कमी कशी करता येईल तसंच त्यासाठी काय उपाययोजना करता येतील, या दिशेने पावलं टाकली पाहिजेत, असंही त्यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवरायांच्या महाराष्ट्रात लष्कराची गरज नाही- उद्धव ठाकरे

कोरोनाचं संकट गंभीर असलं तरीही सरकार खंबीर आहे- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

देशातल्या मुस्लिमांना दुय्यम नागरिक ठरवता येणार नाही- संजय राऊत

आपण गाड्यांची व्यवस्था करतोय, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका- उद्धव ठाकरे

भाजपने विधानपरिषदेची जागा न दिल्याने रामदास आठवले नाराज!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More