डोंबिवलीत राजकीय कुटुंबाच्या लग्नात कोरोनाबाधित व्यक्ती; महापौरांसह नगरसेवकांनाही क्वारंटाईनचा सल्ला
डोंबिवली | मुंबईत 12, कल्याण डोंबिवली 2, पुणे 4, नागपूर 3, जळगावात एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. यात डोंबिवलीत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण ही महिला आहे. विशेष म्हणजे तिने एका राजकीय कुटुंबातील लग्नाला हजेरी लावली होती. त्यामुळे डोंबिवलीत भीतीचं वातावरण पसरलं आहे.
लग्नाच्या आदल्या दिवशी 18 मार्चला रात्री हळदीचा कार्यक्रम होता. या दोन्ही कार्यक्रमात 15 मार्चला तुर्कीहून आलेला नवरदेवाचा चुलतभाऊ सहभागी झाला होता. त्याला विमानतळावर होम क्वारंटाईनचा सल्ला दिला होता. मात्र तरीही हलगर्जीपणा दाखवत तो व्यक्ती हळदी आणि लग्न अशा दोन्ही सभारंभात सहभागी झाला. या लग्नात महापौर विनिता राणे यांच्यासह अनेक नगरसेवकदेखील उपस्थित होते.
या दोन्ही कार्यक्रमात हजारो संख्येने महिला, पुरुष, तरुण, तरुणी आणि लहान मुलंही उपस्थित होते. आता परदेशातून आलेला तरुण कोरोनाबाधित झाल्याने त्याच्यावर कस्तूरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यन, या तरुणांच्या जवळच्या महिला नातेवाईकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे. त्यामुळे डोंबिवलीत भीतीचे वातावरण पसरले आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
आपल्याला कोरोनाला हरवायचंय… आर्थिक मदत करा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
देशसेवेची हीच वेळ… दानशूर रतन टाटांनी केली 500 कोटींची मदत
महत्वाच्या बातम्या-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेपासून होणार प्रक्षेपण
सॅल्यूट… आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांची आणखी 1 हजार कोटींची मदत!
नरेंद्र मोदींचं आर्थिक मदतीचं आवाहन; एका तासाच्या आत अक्षय कुमारची 25 कोटींची मदत!
Comments are closed.