बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी, रूग्ण बरे होण्याचा दर आता 50 टक्क्यांहून अधिक- राजेश टोपे

मुंबई |  कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेने पुकारलेल्या युद्धाला आता चांगलं यश येताना दिसून आहे. नवे रूग्ण जरी मिळत असले तरी आता कोरोना पेशंटला देण्यात येणाऱ्या डिस्चार्जच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.

राज्याचा रुग्ण बरे होण्याचा दर 50.61 टक्के एवढा झाला असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे. सोमवारी राज्यात 5 हजार 71 रुग्णांना घरी सोडण्यात आले.

आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 56 हजार 49 झाली आहे. आज कोरोनाच्या 2786 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 50 हजार 554 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात सध्या 55 शासकीय आणि 42 खाजगी अशा एकूण 97 प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 6 लाख 69 हजार 994 नमुन्यांपैकी 1 लाख 10 हजार  744 नमुने पॉझिटिव्ह (16. 52टक्के) आले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

करण जोहरच्या सिनेमांवर बहिष्कार टाका; सोशल मीडियावर जोरदार मागणी

जामखेडच्या राजकारणात मोठी उलथापालथ, रोहित पवारांचा राम शिंदेंना मोठा धक्का

महत्वाच्या बातम्या-

सुशांतच्या आत्महत्येनंतर विवेक ओबेरॉयचं खुलं पत्र; इंडस्ट्रीला झाप झाप झापलं…!

सुशांतला अशाप्रकारे अपमानित करणं योग्य होतं का?; गायिकेनं शेअर केला धक्कादायक व्हिडिओ

महाविकास आघाडीत कुरबूर, शिवसेनेचे सामनातून काँग्रेसला चिमटे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More