Top News महाराष्ट्र मुंबई

रूग्णसंख्या कमालीची वाढतीये मात्र ‘ही’ गोष्ट राज्याच्या दृष्टीने सकारात्मक घडतीये- राजेश टोपे

मुंबई | गेल्या आठवड्यापासून महाराष्ट्रात कमालाची रूग्णसंख्या वाढलेली दिसून येत आहे. तीन ते साडे तीन हजारांच्या पटीत वाढणारी रूग्णसंख्या आता मात्र पाच हजारांनी वाढायला लागलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 1 लाख 60 हजारांच्या जवळ पोहचली आहे. अशा परिस्थितीत देखील राज्याच्या दृष्टीने सकारात्मक बातमी हाती येत आहे.

कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्राच्या आरोग्य यंत्रणेने पुकारलेल्या युद्धाला आता चांगलं यश येताना दिसून आहे. नवे जास्तीत जास्त रूग्ण जरी मिळत असले तरी आता कोरोना पेशंटला देण्यात येणाऱ्या डिस्चार्जच्या संख्येत लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.94 म्हणजेच 53 टक्के एवढे झाले असून एकूण ॲक्टिव्ह रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता जास्त झाली आहे. राज्यात काल 4430 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 5 हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची वाढ झालीये. आज राज्यात 5 हजार 318 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर शुक्रवारी राज्यात 5 हजार 24 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 59 हजार 133 वर पोहोचलीये.

ट्रेंडिंग बातम्या-

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरापर्यंत पोहोचला कोरोना!

काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा, हा बडा नेता पुन्हा दिल्लीत!

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनाच्या संकटात शिवसैनिक घरात बसून राहिले तर मनसैनिकांनी रस्त्यावर उतरुन काम केलं”

‘ही राजकारणाची वेळ नाही’; शरद पवारांचा काँग्रेसला टोला

संत तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पादुका एस.टी. बसमधून पंढरपूरला जाणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या