Top News महाराष्ट्र मुंबई

राज्यात कोरोनावर मात करण्याचा उच्चांक, एकाच दिवसात बरे झाले 1408 रूग्ण…!

Loading...

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा आकडा वाढत चालला आहे परंतू यामधून देखील एक सकारात्मक बातमी महाराष्ट्राला मिळाली आहे. जसं रूग्णांचं प्रमाण वाढत आहे तसं रूग्णाचं बरं होण्याचा प्रमाण देखील वाढत आहे. राज्याचा कोरोना रिकव्हरी रेट चांगलाच वाढला आहे.

गुरूवारी एकाच दिवसात कोरोनाचे 1408 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आतापर्यंत राज्यभरात 11 हजार 726 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 41 हजार 642 झाली आहे.

मुंबई आणि पुण्यात देखील कोरोनातून बरे होण्याचं रूग्णाचं प्रमाण वाढतं आहे. मालेगावमधलं कोरोनातून बरं होण्याचं प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. मालेगावमध्ये कोरोनाने कहर माजवलेला असताना जवळपास 80 टक्के कोरोनाग्रस्त लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

गुरुवारी नव्याने 2345 नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यात सध्या 28 हजार 454 रुग्णांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

विधानपरिषदेत अमोल मिटकरी त्यांच्या कामाचा ठसा उमटवतील- प्रवीण गायकवाड

पाहा, आज पुण्यात किती रूग्ण वाढले अन् किती रूग्णांना डिस्चार्ज मिळाला…

महत्वाच्या बातम्या-

डोमकावळ्यांची फडफड औटघटकेची ठरेल; संजय राऊतांची अग्रलेखातून सडकून टीका

मुंबईतील कोरोनाची स्थिती ठाकरे सरकारच्या हाताबाहेर गेल्याचं चित्र- देवेंद्र फडणवीस

आधी आपल्या बुडाखाली काय शिजतंय ते चंद्रकांत पाटलांनी पहावं- सतेज पाटील

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या