न्यूझीलंड | पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड दौरा सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी एक पाकिस्तानच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
पाकिस्तानचा संघ मंगळवारी न्यूझीलंडमध्ये पोहचला. पाकिस्तानाच्या 1-2 नव्हे तर तब्बल 6 खेळाडूंना कोरोनाची लागण झालीये.
मुख्य म्हणजे या या 6 खेळाडूंमध्ये कोरोनाची लक्षणं असल्याचं न्यूझीलंडच्या डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय. या सहा खेळाडूंना सध्या ख्राईस्टचर्च या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलंय.
पाकिस्तानी संघ न्यूझीलंड दौऱ्यासाठी निघण्यापूर्वी कोरोना चाचणी करण्यात आलेली. त्यावेळी या सर्व खेळाडू तसंच स्टाफचा अहवाल निगेटिव्ह होता. दरम्यान न्यूझीलंडमध्ये पोहचल्यानंतर या सर्वांची पुन्हा चाचणी करण्यात आली. यामध्ये 6 खेळाडूंचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण
जास्त अंगावर आलात तर…; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं विरोधकांना प्रत्युत्तर
फुटबॉलचे जादूगार म्हणून ओळखले जाणारे दिएगो मॅराडोना यांचं निधन!
आम्ही सुपारी घेणारे, मग तुम्ही हप्ते घेणारे आहात का?; मनसेचा शिवसेनेला सवाल