बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात नियमांना धाब्यावर बसवुन चित्रपटाचं शूटिंग; मनसेचे गंभीर आरोप

मुंबई | कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महाराष्ट्र शासनातर्फे अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू केले गेले आहेत. तसेच स्थानिक प्रशासनातर्फे काही जिल्ह्यात संचारबंदी आणि कडक लॉकडाऊनचे आदेशही काढण्यात आले आहेत.

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील काही पब मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचं मनसे नेते संतोष धुरी यांनी फेसबुक लाईव्हद्वारे उघडकीस आणलं होते. त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

वरळी विधानसभा मतदारसंघात आता परत एकदा शासनाने घालून दिलेल्या नियमांना धाब्यावर बसून दिशा पटानी आणि जॉन अब्राहम यांच्या चित्रपटाचं शूटिंग मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होतं असा आरोप संतोष धुरी यांनी केला आहे. संतोष धुरी यांनी एका व्हिडिओद्वारे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.

सिनेमाच्या शूटिंगसाठी कोणाचा आशीर्वाद होता? असा प्रश्नही त्यांनी या माध्यमातून उपस्थित केला आहे. सामान्य नागरिकांना एक न्याय आणि श्रीमंत, सेलिब्रिटी लोकांना वेगळा न्याय असं युवराज आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात घडत आहे आणि प्रशासनातील अधिकारी हा प्रकार माहिती असूनही जर त्याच्याकडे कानाडोळा करत असतील तर हा प्रकार निंदनीय आहे अशी टीका धुरी यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

“काँग्रेसनं कर्नाटकला IT Hub बनवलं, भाजप कर्नाटकला Porn Hub बनवतंय”

कोणी काहीही म्हणू दे, महाराष्ट्र फर्स्ट हेच धोरण ठेवा- राज ठाकरे

‘हे राज्याला परवडणार नाही’; राज ठाकरेंचं उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांना पत्रं

…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील; रोहित पवारांचे केंद्र सरकारवर गंभीर आरोप

“सध्या देशाची परिस्थिती आणीबाणी बरी होती असं म्हणावं अशीच आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More