बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना निर्बंध पुन्हा लागू करण्याच्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या राज्यांना सूचना

नवी दिल्ली | भारतामध्ये सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू घट होत असताना पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर देशातील निर्बंध देखील शिथिल करण्यात आले होते. पण आता कोरोनाच्या डेल्टा प्लस या नव्या विषाणूमुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. त्यातच भारतात तिसऱ्या लाटेचा धोका असल्याने पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

भारतामध्ये संभाव्य तिसरा लाटेचा धोका लक्षात घेता केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्यांना पत्र लिहून कोरोना निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. सर्व राज्यातील मुख्य सचिव आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाने पत्र लिहून सूचना केले असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण आणणे ही सर्वस्वी राज्याची जबाबदारी असल्याचं या पत्रामध्ये नमूद करण्यात आलं आहे. तसेच बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी राज्यांनी विशेष प्रयत्न केले पाहिजे, असे देखील म्हटले आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या गृह सचिवांनी कोरोनाचे नियम न पाळणार्‍या व कोरोना उद्रेकास कारणीभूत ठरत असलेल्या राज्यांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन लावा असे म्हटले आहे. केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला  यांनी पत्र लिहून सर्व राज्यांना सूचना केल्या आहेत. 

 

थोडक्यात बातम्या – 

 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More