बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी; कोरोना नियमांना हरताळ

पुणे | मागच्याच आठवड्यात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. या प्रकरणी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह 150 जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला.या सर्वांना अटक करुन जामीनावरही सोडण्यात आलं.

पुण्यातील हे प्रकरण ताज असताना असाच काहीसा प्रकार गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात घडला आहे. गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्टिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला. पुण्यातील रांजणगाव येथे दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी गेल्याचं पाहायला मिळालं.

पुण्यात घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत नसून, डेल्टा प्लसचा धोका वाढतोय अस सांगत, नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागलं पाहिजे असं दिलीप वळसे पाटील म्हणाले होते.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेताना संसर्ग रोखण्यासाठी अनेक निर्बंध कायम ठेवले. मात्र पुणेकरांना नियम सांगणाऱ्या गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्टिंगचा फज्जा उडालेला पाहायला मिळाला.

थोडक्यात बातम्या- 

“तुम्ही त्यावेळी जेलमध्ये होता, भुजबळांनी या वयात तरी खोटं बोलू नये”

डेल्टा प्लस व्हेरिएंटपासून सुरक्षिततेसाठी AIIMSच्या संचालकांनी सांगितला हा मोठा पर्याय!

‘ज्याने त्याने ज्याचा त्याचा पक्ष वाढवावा, पण…’; गुलाबराव पाटील यांचं आवाहन

दिलासादायक! मुंबईतील कोरोना आटोक्यात; कोरोनामुक्तीचा दर पोहोचला 96 टक्क्यांवर

राज्यात आज विक्रमी लसीकरणाची नोंद! तब्बल ‘एवढ्या’ नागरिकांनी घेतली लस

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More