मुंबई | कोरोना व्हायरसमुळे आर्थिक राजधानी मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. त्यानुसार मुंबईतून राज्यात देशात किंवा परदेशात कोणत्याही प्रकारचे सामूहिक पर्यटन आयोजित करता येणार नाही.
जागतिक आरोग्य संघटना, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी कोविड 19 अर्थात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याची भीती वर्तवली आहे. त्यामुळे 31 मार्चपर्यंत कोणत्याही टूर ऑपरेटर्सना मुंबईतून खाजगी किंवा व्यावसायिक पर्यटनाचे आयोजन करता येणार नाही, असे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.
मुंबई पोलिसांनी काढलेले आदेश न पाळल्यास कलम 144 जी कारवाई केली जाते ती करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. 31 मार्चला मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पोलिसांचे आदेश लागू असतील.
दरम्यान, मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 5 वर पोहचली आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाचे 32 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाग्रस्तांचा आकडा रोखण्यासाठी खबरदारीसाठी पोलिस प्रशासनाने ही काळजी घेतली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
नवी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकला- जितेंद्र आव्हाड
माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर काळाच्या पडद्याआड
महत्वाच्या बातम्या-
मुंबई-गोवा महामार्गाला कान्होजी आंग्रे यांचं नाव द्या- खासदार संभाजीराजे
सरकारने पोल्ट्री धारकांना किमान 50 रुपये नुकसान भरपाई द्यावी- राजू शेट्टी
Coronavirus | आईची काळजी मिटावी म्हणून पिंपरीत शिकणारा मुलगा घरी परतला
Comments are closed.