बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Corona: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

मुंबई | कोरोनानं जगभरात कहर माजवला आहे. कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. अनेकांना कोरोनाची लागण होत असलेली पहायला मिळत आहे. अशातच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना कोरोनाची लागण (Corona Virus) झाल्याचं समोर आलं आहे.

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad ) यांना कोरोनाचा (Corona) संसर्ग झाल्याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करुन दिली आहे. काल संध्याकाळी काही प्राथमिक लक्षणं जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी लक्षणं सौम्य आहेत. मी आता ठीक आहे आणि मी स्वतःला आयसोलेट केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून जे मला भेटले त्यांनी खबरदारी घ्यावी अशी मी विनंती करते, असं ट्विट वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या दररोज सहभागी होत आहेत. यातच आतच आता त्यांच्या संपर्कात आलेल्या नेत्यांनाही कोरनाची लागण झाली असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्राॅननं राज्यात थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस ओमिक्राॅनच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. ओमिक्राॅनचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

“…तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म”; भास्कर जाधव कडाडले

पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागात अलर्ट जारी

‘तिसरी लाट आलीच तर ती…’; Omicron बाबत दिलासादायक माहिती समोर

“उद्धव ठाकरे आजारी आहेत तोपर्यंत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करावं”

एसटी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेणार का?, अनिल परबांनी स्पष्टच सांगितलं

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More