बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळजी घ्या! शरीराच्या ‘या’ अवयवातही लपून बसू शकतो कोरोना व्हायरस

वाॅशिंग्टन डी.सी. | कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचं पालन करणे तसेच हात, नाक, तोंड व डोळ्यांची काळजी घेणं गरजेचं असल्याचं आपणास माहित होतं. मात्र आता कानाच्या खाली किंवा कानाच्या मागे लपून राहू शकतो, असा नवा दावा संशोधनातून समोर आला आहे.

जगप्रसिद्ध जाॅन हाॅपकिन्स युनिवर्सिटीच्या तज्ञांनी याबाबत काही निष्कर्ष मांडले आहेत. कानाच्या अवयवाकडे सहसा कुणाचे लक्ष जात नाही. मात्र कानाच्या आतील भागात किंवा कानाच्या मागे डोक्याच्या खालील भागात कोरोना विषाणू बरेच दिवस तग धरून राहू शकतात, असा दावा युनिवर्सिटीच्या तज्ञांनी केला आहे.

तसेच स्नान करताना यापुढे कानाचा आतील भाग साफ करण्याची नवीन सवय नागरिकांनी स्वतःला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी लावली पाहिजे असं मतही युनिवर्सिटीच्या संशोधकांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी नागरिक शक्यतो सर्व प्रकारची काळजी घेत आहेत. याउलट कोरोनाच्या काळात अनेक नव्या आरोग्याच्या सवयींची नागरिकांना ओळख झाली आहे. जाॅन हाॅपकिन्सच्या या नव्या दाव्यानं आता कान साफ करण्याची नवीन सवय अंगवळणी पाहावी लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोना साखळी तोडण्यासाठी…., गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश

‘त्याग, समर्पणाच्या शिकवणीचा वसा घेऊ या’, मुख्यमंत्र्यांकडून बकरी ईदच्या शुभेच्छा

‘या’ दोन शहरांत 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन वाढवला

पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर निवृत्त; शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन म्हणाले…

अहो आश्चर्यम!; ‘ही’ कंपनी तंबाखूपासून बनवतेय कोरोनाची लस, लवकरच…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More