महाराष्ट्र मुंबई

धारावीने करून दाखवलं, कोरोना फैलावाचा वेग मंदावला!

मुंबई |  आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असलेल्या मुंबईत धारावीत कोरोनाने धमाका केला होता. गेल्या अनेक दिवस इथे कोरोनाची वाढती संख्या होती. धारावीत कोरोनाला रोखणं हे प्रशासनासमोरचं मोठं आव्हान होतं, परंतू आता धारावीत कोरोना फैलावाचा वेग कमी झाला आहे.

गुरूवारी धारावीत 25 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. मात्र शुक्रवारी फक्त 6 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. यावरून कोरोनाचा फैलावाचा दर हळूहळू कमी होताना दिसून येत आहेत.

धारावीतल्या प्रत्येक घरोघरी जाऊन प्रशासन लोकांचं स्क्रीनिंग करत होतं. प्रशासनाला दाट लोकसंख्या आणि अतिशय कमी जागा हे दुहेरी आव्हान पेलावं लागत होते. मात्र आता कोरोना फैलावाच्या वेगावरून प्रशासनाच्या प्रयत्नांना यश आलं आहे.

दरम्यान, धारावीत 6 कोरोनाबाधित वाढल्याने रुग्णांची संख्या 220 वर जाऊन पोहोचली आहे. तर कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत धारावीत 14 जणांनी आपले प्राण गमावले आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा कधी होणार?, उदय सामंत म्हणाले…

कोरोनामुळे जगभरातील उद्योग बुडाले मात्र ‘या’ तीन उद्योजकांची चांदी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या