बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी केंद्र सरकारकडून नवी नियमावली जारी

नवी दिल्ली | देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या जशी वाढतेय, तशी मृतांची संख्याही मन हेलवणारी आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. तर दुसरीकडे आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत असल्याचं चित्र दिसत आहे. देशातील प्रत्येक राज्यात अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच कोरोनाचा प्रसार आता हवेतून होत असल्यानं केंद्र सरकारनं कोरोना नियम आणि उपचारात काही बदल करत नवी नियमावली जाहीर केली आहे.

नव्या नियमावलीमध्ये सरकारचे मुख्य वैद्यकीय सल्लागार यांनी कोरोना हा हवेतून 10 मीटरपर्यंत पसरू शकतो, असं म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता आणि योग्य व्हेंटिलेशन ठेवण्याचा सल्ला दिला आहे. संक्रमित व्यक्तीपासून ड्रॉपलेट 2 मीटरपर्यंत तर एरोसोल्स 10 मीटरपर्यंत जातात. याआधी कमीत कमी 6 फूट म्हणजे 1.8 मीटर सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचा सल्ला देण्यात आला होता.

नियमावलीमध्ये उपचारासंदर्भात सांगितलं की, कोरोनाची लक्षणं कमी असलेल्या रुग्णाला आयवरमेक्टीन औषध रिकाम्या पोटी दिवसातून एकदा दिले जाऊ शकते. मात्र गर्भवती महिलांना हे औषध देण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना स्टेरॉईड देण्याची आवश्यकता नाही. मात्र लागण झाल्याच्या 7 दिवसानंतरही ताप किंवा खोकला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ओरल स्टेरॉईड देता येऊ शकतं, असंही नवीन गाईडलाईनमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, याआधीच्या नियमावलीमध्ये सरकारनं म्हटलं होतं की, कोरोनाचा संसर्ग केवळ कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्यानंतरच होतो. मात्र आता जेव्हा संक्रमित व्यक्ती खोकते किंवा शिंकते तेव्हा बाहेर पडणाऱ्या थेंबावाटेही कोरोना पसरतो, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. त्यानुसार सरकारनं कोरोना नियमावलीत काही बदल केले आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“बाबा रामदेव यांनी माफी मागितली नाही, तर 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू”

सर्कसमधील खेळ सुरू असताना अचानक सिंहाने ट्रेनरवरच केला हल्ला अन्…, पाहा व्हिडीओ

“जर पाकिस्तानने हल्ला केला तर राज्यांवर जबाबादारी सोडणार की उत्तर प्रदेश स्वत:चे रणगाडे खरेदी करणार?”

मास्टर प्लॅन! अमेरिकेत बसून भारतातील पत्नीची हत्या, धक्कादायक कारण आलं समोर

लक्षण कोणतीही असली तरी डॉक्टर सांगायचा कोरोना त्यानंतर…; ग्रामस्थांनी अशाप्रकारे फोडलं बिंग

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More